नाईट ट्रेक नाईट ट्रेक असा खुप दिवस झाले ठरत होत, मग सुरवात म्हणून कर्नाळा करायचा ठरला पण तो खुपच साधा आहे म्हणून रायगड ठरला (जी माझी इच्छा होती) अणि गेलो नाणेघाट जीवधान ला.
6 ला एकत्र भेटयच ठरल कल्याण डेपोला अणि भेटलो पण (राजेश सोडून). राजेश मुळे एक बस सोडली. दुसऱ्या बस मध्ये आम्हाला घेतलच नही सो ती पण सोडली. शेवटी कंडक्टर ला मस्का मारला अणि तिसरी बस पकडली.
नाणेघाट ला जायला वैशाखरे नावाचा गांव लगत जे माळशेज घाटाच्या अधी आहे. नाणेघाट ट्रैकिंग पॉइंट नावाचा फांटा आहे इकडे उतरून 3 तासात नाणे घाट गुहा लागते. गुहेच्या उजव्या बाजूला जीवधान किल्ला आहे जो 5 तासांत असेंड अणि डिसेंड होतो.
मी, श्रीपाद,राजेश अणि चेतन असे 4 वेडे ट्रेकर बस मध्ये बसून tp करत बसलो अणि श्री ला मध्येच हुक्की अली "गेम ऑफ़ थ्रोन्स" ची गाणी गायची अणि तिथुन पुढचा प्रवास त्याच गप्पा मरण्यात गेला झालेल्या 4 सीजन ची उजळणी झाली. ST ने आम्हाला स्टॉप वर उतरावलच नही अणि हे होणारच होत कारण मी, श्री अणि राजेश एकत्र आलो की अस होत असत. 20 km पुढे गेलो अणि 2 ट्रक बदलून पुनः फट्यावर आलो अणि ट्रेक चालू केला.
टोर्च बंद केला तर धड दोन फुटावरच दिसत नव्हतं थोड़ी भिती वाटली करण पहिलाच नाईट ट्रेक होता. "जय शिवराय" बोलून ट्रेक चालू केला मग कसली भिती अणि काय. एक तास मजेत गेला कारण आम्हाला रास्ता सापडत होता. थोड्या थोड्या अंतरने आम्ही टॉर्च बंद करुन 'नाना चा अंगठा' बघत होतो म्हणजे आम्ही वाट चुकणार नाही. कही वेळात आम्ही एक चुकीचा वळण घेतल अणि रास्ता भटकलो. दोन तास तंगड़तोड़ केली पण रास्ता सापडला नाही मग कैम्प करायचा ठरवला अणि एक जगा शोधून तिकडे कैम्प लावला.
कोणालाही झोपायची इच्छा नव्हती म्हणून गप्पा मारत बसलो गप्पा मरता मरता एक एक जण झोपला. मी शेकोटी मध्ये लकड़ टाकत बसलो. सकाळी पाच च्या सुमारास खुप सरे पक्षी किलबिल करत होते मस्त वाटल ऐकून. गार वारा अणि सगळीकडे धूक पसरलेल त्यात सगळ्या झाडांवर दव पड़लेल असा सुंदर निसर्ग बघायला अणि अनुभवायला मिळाला. सकाळी सहा वाजता सगळे उठले बघतो तर डोक्यावर मधमश्या गोंगावत होत्या सगळे पळत सुटलो.
पुनः तोच 'नानाच अंगठा' बघत आम्ही प्रवास चालू केला अणि एक एरो मार्क सापडला तिकडून दोन तासात गुहेजवळ पोहोचलो. वर जाऊन एका टोकावर बसून आकाशात पक्षा प्रमाणे उडण्याचा आनंद घेत बसलो. 15 मीनीट आराम करुन गुहेतुन नानाच्या अंगठा गाठला. अस होउच् शकत नही की ट्रेक ला गेलो अणि फोटोग्राफी चा सेशन नाही केलाय म्हणून थोडे फ़ोटो काढले. रात्री वाट हरावल्यामुळे आमचा खुप वेळ गेला होता मनावर दगड ठेवून आम्ही जीवधान कैन्सल केला.
सकाळी दहा च्या सुमारास आम्ही परत जुन्नर ला जायला निघालो तेव्हा कळले की बस 10.30 ला आहे अणि आम्हाला 4 km चालत जाव लागणार आम्ही कसेबसे घाटघर स्टॉप वर पोहोचलो. गवकारी लोकंबरोबर रस्त्यावर बसून ST ची वाट बघीतली. ST अली अणि आम्ही जुन्नर ला कधी पोहोचलो काळल पण नाही.
जुन्नर ST स्टैंड च्या मागच्या बाजूला शिवनेरी किल्ला आहे आम्ही चरही जण मनातून त्या किल्यावर जाउन आलो पण वेळ नसल्यामुळे तो पण प्लान कैन्सल करावा लागला. तिकडेच ठरले की पुढचा ट्रेक शिवनेरी जीवधान करायचा.
- संकेत नाईक (15/03/2015)