Ultimate Travel Experience to Vietnam - Hanoi

व्हिएतनाम-हॅनाइ 


सुट्टी आणि संधी एकत्र आली होती म्हणून मी प्लॅन करताच होतो 'व्हिएतनाम' साठी. चहा पिता पिता मित्रांमध्ये बोलो तेव्हा लगेच उदय बोलला की मी पण येईनआम्ही दोघांनी पण दक्षिण व्हिएतनाम बघितलंय आणि दोघांना पण ह्या देशाने वेड लावलाय आता वेळ होती उत्तर व्हिएतनाम ची. ठरलं, प्लांनिंगच काम माझ्याकडे.

व्हिएतनाम ला जायचं असेल तर आधीच एक 'ऑथॉरिटी लेटर' घ्यावा लागतं मग 'visa  on arrival ' सगळं मिळून पूर्ण खर्च होतो २२०० INR. उत्तरेत दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या नक्की बघायच्या त्यातली एक 'सापा'  चा डोंगर आणि 'हालॉंग बे'. हॅनाइ ही राजधानी, विमानांनी इथपर्यंत जात येतं मग पुढचा प्रवास ट्रेन नाही तर बस. मी फक्त विमान आणि ट्रेन ची तिकिटं काढली बाकी जसा होईल तसा प्रवास करायचं ठरवलं.

 दोघांनी सकाळी ऑफिस गाठलं काम करून १२ ला निघालो कडकडून भूक लागलेली म्हणून चरायला घेतलं आणि प्रवास सुरु केला. एअरपोर्ट ला आलो.. (एक वेगळीच मज्जा असते राव एअरपोर्टवर आलं की). १ ला उडणारा विमान २ ला उडालं आणि आम्ही सिंगापुर सोडलं. सोबतीला  'तेजोनिधी लोहगोल' माझ्या कानात चालूच होतं. प्लॅन असा होता की हॅनाइ वरून रेल्वे स्टेशन मग तिथून ट्रेन ने लाओ काई पर्यंत पुढे जीप किंव्हा बसने सापा गाव आणि ट्रेक करून पुन्हा रात्री ट्रेन नी हनोई मग हालॉंग बे. (हॅनाइ - लाओ काई ३०० किमी, लाओ काई - सापा ५० किमी, हॅनाइ - हालॉंग बे १८० किमी). तसा प्रवास खूप लांबचा होता पण आमच्यात किडे पण कमी नव्हते ... सो चालायचंच.

हॅनाइ - लाओ काई ट्रेन 



वैदेही

एअरपोर्ट ला उतरलो तर टॅक्सी वाले भसा-भस अंगावर येतं होते शेवटी बस नी जायचं ठरलं ( म्हणजे हानोइ चा एस. टी. महामंडळ ) ३० $ च्या ठिकाणी २$ मध्ये काम झालं. .सोबतच एक मैत्रीण झाली 'वैदेही' ही बंगलोर ची IT मधला जॉब सोडून ब्रेक मध्ये NGO साठी काम करायला एकटी अली होती.  खरं तर कौतुक करण्यासारखं आहे. गप्पा मारत रेल्वे स्टेशन ला आलो. हावरट सारखी कॉफी शोधली आणि जेवणही जेवलो. सगळं झाल्यावर वैदेही कडे बॅग ठेवली आणि उनाड भटकंती केली उगाच कुठेही गावात फिरून आलो. ट्रेन मध्ये जागा शोधली आणि सामान ठेऊन परत स्टेशन वर 'tp' करत बसलो. ट्रेन खरंच छान होती. आमच्या सोबत एक जर्मन जोडपं होतं मार्क आणि सिल्विया इतक्या गप्पा तर मी उदय सोबत पण नव्हत्या मारल्या एवढे गप्पा मारणारे जर्मन भेटले. मार्क DJ /RJ  होता आणि सिल्व्हीया जर्नलिस्ट. पोट भर गप्पा मारून झोपून गेलो सकाळी लाओ काई ला उठलो आणि सापा साठी परत बस पकडली.


मार्क आणि सिल्व्हीया


मार्क आणि सिल्व्हीया

उतरल्या वर बाहेरचं वातावरण बघून सगळा थकवा गेला. एक हॉस्टेल शोधला आणि बॅगा फेकल्या आणि ट्रेक च्या शोधला लागलो. बाहेर गावातल्या काही बायका उभ्या होत्या. त्यांना विचारला (म्हणजे विचारायचा प्रयन्त केला कारण त्यांना आमची भाषाच काळात नव्हती) शेवटी एक मावशी सोबत ट्रेक ठरला ... आम्ही म्हणालो $ .. सापा.. ट्रेक ... फूड .. ती म्हणाली ऑल ओके फूड आत माय होम म्हणलं ठीक. उद्धेश एवढाच कि निदान गरिबाला पैसे तरी मिळतील. ट्रेक तर खूपच मज्जा अली असा वाटलं नाशिक ला आलोय आणि आता कुठे तरी तटबंदी नाही तर बुरुज दिसेल... असो. 


१५ किमी चालून मस्त त्या मावशी च्या घरात गेलो. हात पाय धुवून भाताच्या शेतात गेलो, गुढघा भर चिखलात रोपं लावलेली होती. ती बघत बसलो. तोवर मावशीने चूल लावून जेवण बनवलं भात, तोफू, टोमॅटो ची भाजी आणि अंडं जवळ जवळ २ दिवसांनी नीट जेवण मिळालं उदय तर भातावर तुटून पडला. जेऊन अजून फिरायची इच्छा झाली आणि परत १ तासाचा छोटा ट्रेक करून पुन्हा सापा ला आलो तेच हॉस्टेल वर जाऊन सामान आवरलं आणि दिवसातली ४ थी कॉफी प्यायलो. आणि परतीचा प्रवास चालू केला.



पुन्हा तीच ट्रेन पकडून हॅनाइ ला आलो ट्रेक मुळे दामलेलो म्हणून झोप मस्त लागली. पुन्हा तोच दिनक्रम सकाळी ६ ला स्टेशन ला उतरून हॉस्टेल शोधलं बिचारा झोपला होता आवाज देऊन उठवलं आणि हालॉंग बे ची टूर पण ठरवून टाकली. ८ ला निघालो अक्खी बस भरून लोक. हालॉंग बे ला पोहोचलो जेवण बोटीवरच केला (मासे, कोलंबी, भात) जेऊन थोडा वेळ फोटोग्राफी केली. कायाक चालू झालं.. पुन्हा पाण्यात मस्ती करायला मिळाली आणि बाजूला सगळे डोंगर. सगळा उरकून पुन्हा हॉस्टेल वर आलो. थोडा अराम करून नाईट मार्केट बघायला गेलो सोबत मित्र पण होते. रात्री रस्त्यात बसून जेवलो पुन्हा हॉस्टेल वर आलो. नवीन रूम पार्टनर आले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्या. हे दोघं अर्जेन्टिना वरून आलो होते.. ३ वर्ष नोकरी करून सगळा सोडून 'वर्ल्ड टूर' साठी निघाले होते वाटतं. चिनू आणि डायना व्हिएतनाम च्या आधी अक्खा भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार, असे फिरत आले होते आणि ११ महिने फिरणारच होते... असा वाटलं ह्याच्याकडे तर क्लास लावायला हवा ट्रिप प्लॅन करायचा.

चिनू आणि डायना









हालॉंग बे

एकंदरीत जास्त काही प्लॅन न करता खूप काही करून आलो. जवळ जवळ १२- १५ देशातल्या लोकांना भेटलो. काही नवीन मित्र जोडले आणि खूप सारे अनुभव जमवून आलो.

- संकेत नाईक



Reactions

Post a Comment

0 Comments